गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

दिल को तुम समझालो..

दिल को अपने कभी ये न समझाओ कि आनेवाले हर मोड पे तुझे जितना है ....
मगर हा ............दिल को ये जरूर समझाओ अगर कभी हार भी गये तो  गिरकर  तुझेही  उठना है ...........

- मोहनिश


रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

"एकतारा" - अडचणीने भरलेल्या आयुष्याच उत्तर ...........


“To find someone close ,close in such way that he will always be there for all the stuffs which you need to share with that person”.

 life मध्ये जस आपण पुढे जात असतो हळू हळू आपल्या सोबत तशाच गोष्टी घडत जातात ज्या आपल्या स्वभावाची प्रतीरुत्ती भासवतात .मग अशातच त्या धाडणाऱ्या घटना एकतर आपल्याला त्रासदायक वाटू लागतात नाहीतर या आपल्याशीच का घडतात या संभ्रमात आपण पडलो जातो.मग खर पाहिलं तर हे सुरु असलेल चक्र आपल्या विचारांच्या पातेवरच बनल असत आणि हि गोष्ट जोपर्यंत माणसाला समजत नाही तोपर्यंत माणूस पण तारेला अडकलेल्या कपड्याच्या चिंधी सारखे अडकून जातो त्याच्या रोजच्या दुनियेत ..त्याला कंटाळवाण्या वाटणाऱ्या दुनियेत " येणारा प्रत्येक उन्ह वर पाउस झेलत तो वाट पाहू लागतो त्या तारेतून सुटका होईल याची. 
समोर आलेल्या अडचणींना पर्याय शोधता शोधता आपण कधी तर अडचणींनाच विसरून जातो कारण या गुंतागुंतीमध्ये समोर इतके व्याप वाढतात कि अडचणींचा डोंगर हा असा समोर दिसायला सुरुवात होते मग नेमकी कोणती अडचण दूर करायची न नेमक कोणत सोल्युशन कशासाठी हवाय हाच मोठा प्रश्न पडतो. साधारण जीवन सुरु होताना छोट्या मोठ्या गोष्टी मध्ये चालवून घेऊ या समीकरणातून हळू हळू आपण बाहेर आपोआपच पडायला लागतो .एक एक गरज भागवता तोपर्यंत अजून एक गरज समोरच दिसायला लागते. शालेय जीवनापर्यंत फक्त अभ्यासच दोखेदुखी वाटत असतो आपल्याला पण शिक्षण संपवून जेव्हा या विशाल दुनियेच्या गेट वर येऊन आपण उभे राहतो तेव्हा प्रश्न पडतो कि पुढे करायचं तरी काय ?? माणसाच  जीवन हे तिथपर्यंत साधारण असते जोपर्यंत त्याच्या गरजा ह्या साधारण राहतात. खर सांगायचं तर "गरजा वाढवण " हेच मोठ व्यसन आहे आपण मध्यम वर्गीय जनतेसाठी . आज जर स्वतःच्या टेन्शन मधून तुम्ही जरा डोके बाहेर काढून पाहाल तर तुम्हाला समजेल कि इथे तर प्रत्येकजणच खूप बिझी झालाय. अहो डोक्यावरच वाढलेलं हे ओझ तुम्हाला शांत बसूच देत नाही.मिळणाऱ्या वीकेण्डला चला कुठतरी जाऊन चिल मारू हि गोष्टच आजकाल फक्त एक कल्पनाच वाटू लागायला सुरुवात होते. आपण काही वर्ष अगोदरचे होतो तेच आहोत फक्त मध्ये थोडा काळ गेलाय पण या अगोदर तुम्ही एक स्वछंदी पक्षासारखे जगत होता ज्याला तिमिराची न फिकीर होती न उंच उडायचं भय. आता आपण घाबरतोय आपल्या अंथरूनाच्या बाहेर पाय पसरायला न घाबरतोय आपण त्या अशक्य वाटणाऱ्या पण स्वतःच्या असणाऱ्या ध्येयाकडे पाहायला देखील. तेव्हा Life मध्ये मस्ती होती एन्जॉयमेंट मोठी आणि सभोवताली लोकांचा गोतावळा सुद्धा. पण आज हे आपल्याजवळ सगळ आहे का हे पाह्नायची गरज प्रत्येक माणसाला पडली आहे. आजही आपण तेच आहोत पण त्यावेळचे जे पंख ते कसलाही भार न घेता उडू पाहत होते न आजचे तर झुकले गेले आहेत या रोजच्या धावपळीत. आज शनिवार रविवार सुट्टी मिळते खरी पण सोमवार ते शुक्रवार दरम्यान आलेल्या कामासाठी न्याय देता देता रविवारी झोपताना आपण हाच प्रश्न स्वतःला विचारतोय कि विकेंड सुरु झाला अन संपला कधी हे कळलच नाही.   
आयुष्य आपल आहे त्यामध्ये येणाऱ्या समस्या आपल्या आहेत मग ते सोडवायच्या देखील आपल्यालाच आहेत हे साध गणित माणूस चुकत चालला आहे.एखाद्या मैफिलीत ती रंगण्यासाठी जशी सगळी वाद्ये एकमेकांना साथ देतात तेव्हा कुठ ती मैफिल रंगली जाते तबला,पेटी,डमरू,वीणा आणि अनेक छोटी मोठी वाद्य याचा सुरेल संगम होते न ती मैफिल रंगते .आपल्या आयुष्याच्या मैफिलीमध्ये असेच सोबतीला वाद्य मिळतील हे गृहीत धरून चालतो माणूस पण जीवन जगत असताना आपण असतो ती फक्त  "एकतारा". जी शब्दाना ताल देते अन वाजत राहते एकटीच अगदी शेवट पर्यंत. ती एकतारा आपण आहोत .

 कोणत्याही गोष्टीचा आनंद व्यक्त कार्यासाठी माणूस दारू पिऊन तो साजरा करतोय ,आज हसण्यासाठी त्याला सेल्फी ची मदत घ्यावी वाटू लागली आहे ,मित्राशी बोलायचं तर ते फक्त फोन वरूनच सुरु आहे आणि आजकाल तर प्रेम जरी करायचं म्हटल तरी ते फक्त अट म्हणूनच. खर पाहायला गेलं तर माणसाला मिळालेले भावना ह्याचखऱ्या त्याला त्याच्या तणावापासून दूर करू शकतात. आज फेसबुक मधून तुम्ही मैत्रीचा हात पुढे करताय आणि तुमच्या आवडीनिवडी माहित असलेल्या मित्राला तुम्ही विसरत चाललाय .दुखामध्ये काय करायचं याच उत्तर कुठेच मिळणार नाही कारण अशा आजपर्यंत ते उत्तर कुणाला मिळालच नाही. स्वतःच्या सुखामध्ये सगळ्यांना सामील करून घ्या आणि दुसरयाच्या दुखत न बोलावताच जा मग पहा स्वतःच्या आनंदाहुनही दुसर्याचा आनंद अतिप्रिय वाटायला लागेल. आपल्याला कोण मदत करेल याची वाट पाहत राहिलात तास तसेच राहाल अगदी मरेपर्यंत पण जर येणाऱ्या अडचणीवर मत करून हसत सामोरे जाल तर सुखाची दारे सदैव खुली राहतील तुमच्या साठी .तर नको आहेत आपल्याला ती अनेक वाद्य आपले जीवन संगीत सुरेल बनवण्यासाठी आपण मात्र "एकतारा " आहोत आपल्या जीवनासाठी.


- मोहनिश महंमद खुंटे.