रविवार, १३ डिसेंबर, २०१५

फुटलेल्या फोटोतून रडताना .........

                                                             फुटलेल्या फोटोतून रडताना .........

तिला रडताना, तिच्या पप्पांना तिने मिठी मारताना पाहिलं अन शेवटी न राहून माझ्यापण काळजातून तिच्यासाठी भावना निघाल्या पण मी रडणार तरी कशी ? शेवटी वर्षभर चालू असणाऱ्या ह्या सोहळ्याचा काचेतून मन भरून आनंद लुटणारी मी माझी मोना सोडून जाताना स्वतःला आवरू शकली नाही.आतापर्यंत सर्व नातेवाईक आलेले पै पाहुणे आमची भेट घेऊन जात होते, लग्न मस्तच झाल ,खूपचं छान झाल अशा प्रकारच्या भावना सगळंच्या कडून होत्या. त्याने तिला सगळच दिल होत म्हणा पलंग,गादी कपात भांडी , वंदना ने पण रुखवत असा की सजवला होता जणू नवीन संसारच ..हो तर नवीन संसारच होता माझ्या मोनाचा..प्रत्येक बापाला वाटत माझ्या मुलीला मी त्या सगळ्या गोष्टी देल ज्या तिला तिच्या संसारात उपयोगी येतील न हे सगळ जुळवा जुळाव करण्यासाठी न जाणो किती तरी रात्री लहना अगोदर तो झोपला देखील नसतो. मोनाला तर ते सगळच मिळालाय पण तिला अजून एक अमूल्य अस जर की मिळाल असेल तर तिचे पप्पा”. मोना नांदायला जाताना पपांच्या गळ्यात पडून रडत होती कदाचित तिला ते सगळ आठवत असेल जे एका थोरल्या मुलीला जाणीव असते कि आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी लहान भावन्दासाठी आपला बाप किती कष्ट करतोय ते. ते चित्र पाहताना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलेले होते.तस म्हणजे मागच्या एक वर्षापासून सुरु असलेला असलेला हा लग्न सोहळा आज कुठेतरी संपूर्ण होत होता.साखरपुडा तसा मार्च मधेच झाला होता तेव्हापासून ते आजपर्यंत एक एक दिवस आम्ही सर्वच मोजत आलो होतो. खर आहे मुलीच्या लग्नात जो जास्त रडतो तो तिचा बापच असतो. मी मात्र लांबून सगळ फक्त पफात होते. मोनाला कधी एकट जाऊ दिल नाही ती शाळेत जायची फलटण ला तेव्हा मीच सकाळी सोडायला जायचे. आज मोना असाच तिच्या नव्या दुनियेत जात आहे न मात्र दुरून हे पाहत आहे. रडू तर मला पण येत होताच.


एक एक वस्तू जोडायची, गावात लग्नाची तशी चर्चा झालीच होती.नवरी मुलीच्या आईचा थाट तसा जोरातच होता पण वंदनापण गेली काही दिवसापासून लग्नाच्या गडबडीतच होती. काल तर विशेषच झाल आज पहिल्यांदाच गावातल्या बायका घरी जमा झाल्या असतील.बांगड्याचा कार्यक्रम वंदनानेच जोरातच केला.घरात परंपरेनुसार जात पुजल गेलं बायकांनी अगदी सुरात गाणी म्हणायला सुरवात केली सार्या घरात अगदी आनंदच वातावरण होत.अगदी वरच्या आळीपासून बायकांची गर्दी होती. सुहासिनी जेवणाचा कार्यक्रम पण मस्त झाला.मी मात्र आज अगदीच खुश होती आणि खुश का नसणार मी जेव्हा बाकी मुलींची लग्न होताना पहायची तेव्हा वाटायचं माझ्यापण मोनाच असच लग्न करायचं आणि आज अगदी तसाच होत होत.         
 

मुंबईची पाहुणी, विंचुर्णीची, बिजवडीची,दौंडची सगळी जमा झाली होती. मला तर अगदी हरकून गेल्यासारखं होत होत.
लग्न म्हटल कि हळद आलीच, पोरगी पिवळ्या साडीत न गालावरच्या हळदीमध्ये अजून च खुलून दिसते. कालच हळदीचा कार्यक्रम झाला . हळद लावयला सुरवात झाली न सगळ्यांनी अगदी नाचून नाचून तो क्षण अगदी अविस्मरणीय बनवला. तो जेव्हा मोनाला हळद लावायला आला न मोनाच्या डोळ्यात पाणी आले तो हि रडला खर तर त्याच्या डोळयातून मीच रडत होते आज आमची मोना खरच लग्न होऊन जात आहे या भावनेने .... 
आजपर्यंत या दिवसाची आतुरतेने वाट पाहणारे आज पहाटेच उठलो रात्री मेहंदीच्या नादात पहाट कधी झाले समजलच नाही.मी मात्र तशीच जागी आहे माझ्या घरातला हा आनंद डोळेभरून पाहण्यासाठी...आज लग्नाच दिवस घरातून निघत असताना धावपळ हि होत असतेच वर्हाड तास की जास्त लांब जाणार न्हवत पण तरी आम्हा सगळ्या बायकांची म्हातार्यांची न्यायची सोय चांगली केली होती. मी या गोंधळात कुठे होते ? आज मी पण माझ्या मोनाच्या लग्नात जायला अगदी उत्साहाने तयार झाले न गाडीत अगदी समोर बसून आम्ही वाजत गाजत गावातून मिरवणुकीत निघालो. आज या घरातून आमच्या मोनाचा शेवटचा दिवस होता तस ती इकडे येतच राहील हो पण आज जे तिच स्वतःच घर आहे ते उद्या तीच माहेर होणार असणार.

" खर तर देवाने मुलीला जन्माला घालून खूप सुंदर असा धागा बनवलाय हा धागा दोन घराला,दोन परंपरेला अगदी हळुवार पणे जपत असतो " हि नाती सांभाळताना ज्या काही गोष्टी एक स्त्री करते खरच हे फक्त एक स्त्रीच समजू शकते.
आणि आम्ही लग्न स्थळी पोहचलो. हळू हळू बाहेरच्या गावची लांबून येणारी नातेवाई जमा होत होती दुपारची वेळ न रविवारचा दिवस त्या मानाने गर्दी व्हायला सुरुवात झाली नवऱ्याच वर्हाड पण एव्हाना कार्यालयात पोहचल होत. जवळपास १००० पेक्षा जास्तच लोक जमा झाली होती सगळ्याची धावपळ दिसत होती कुणी जेवणाच्या ठिकाणी पळतंय तर कुणी अक्षता पोहचल्या का नाही ते पाहत होते. नवरदेवाची घोड्यावरती वरात आली तशी इकडे मंडपात प्रमुख पाहुण्याचे सत्कार सुरु करण्यात आले फलटणचे राजे, आमदारसाहेब नवरा-नवरीला आशिर्वाद द्यायला आले होते.या धावपळीत मी कुठे होते ? मी तिथच मंडपात जवळून सगळ पाहत होते.
अशा प्रकारे लग्नाला सुरुवात झाली. एक एक मंगलाष्टकं भान्तिजी पुकारत होते , एका बाजूने त्यांचा आवाज कानावर पडत होता तर दुसरीकडे माझ्या डोळ्यासमोर अगदी लहानाची मोठी होणारी मोना येत होती लहन असताना तिच्या येण्याने माझा परिवार अगदी खुश झाला होता न का होणार नाही अगदी लहानपणापासूनच मोना तशी गुणवान होती हळू हळू ती मोठी होत गेली न शाळेत पुढे कॉलेजला ती तिच्या सोबत आमच पण नाव कात गेली. मी मात्र त्या लहान मोनाच्याच आठवणी मध्ये रमले असता अचानक फटाक्यांच्या आवाजाने माझे भान जाग्यावर आले. राहुलरावांनी मोनाला वरमाळ घातली न जमलेल्या पै पाहुणे आप्तेष्ट मित्रपरिवार सगळ्यांनी पुष्पांचा वर्षाव वर-वधू वर केला.  

         गेली वर्षभर याच क्षणासाठी सुरु असलेली धावपळ आज कुठतरी शांत झाली.जेवणाच्या पंगती सुरु झाल्या पंच पक्वनाची गोडी आणि मोनाच्या ओठावरच गोड हसू पाहून मन भरून जात होत न हळू हळू मी मलाच शोधू लागले.मी तिथच होते पाहत हा सगळा सण.
आता वेळी आली होती ती निरोप घ्यायची. "माणसाच कस असत ना त्याला एक वेगळीच कला देवाने दिली असते आतून मन रडत असल तरी ओठावर हसू दाखवायचं न चेहऱ्यावर समाधान!" असाच इथ पण झाल होत तासाभरापूर्वी फोटोसाठी हसणारी लोक लग्नात हसून गप्पा मारणारी तीच लोक यांना मुलगी निरोप घेतांच नक्की की होत की माहीत. तस म्हटल तर स्त्रीलाच रडण्याचा हक्क असतो म्हणे का तर त्याचं काळीज फुलासारखं असत अगदी नाजूक न पुरूषांच कठोर दगडासारख ! आज मी जवळून पाहिलं मुलगी सासरी नांदायला जातानाची जी वेळ असतेना तेव्हा तिथ तिच्या जवळ न स्त्री असते न पुरुष तिथ फक्त एक मन असत एक कलीच असत जे गेल्या २३-२४ वर्ष फक्त त्या मुलीच्यासाठी जगात आलेल असत. आज तिचा बाप पण तिच्या गळ्यात पडून रडत होता ,वंदना कुणाच्या तर खांद्यावर डोक ठेऊन रडत होती मैनु मीनल ला जवळ घेवून ती रडत होती. मोना ने गेली ५ वरच तिच्या भावंडान अगदी आईबापा सारख संभाळल होत.दादू कुठाय दादू कुठाय अशी तिने हक मारली दादुला जवळ घेऊन दिने मिठी मारली आणि बोलली सगळ्यांची काळजी घे कुणाला रडू देऊ नकोस. आज ती सगळी कर्तव्य पूर्ण करून पुढे जात होती एक मुलगी म्हणून ती घरात सोन्यासारखी राहिली एक पोर म्हणून आई बापाला सगळ दिल एक मोठी ताई म्हणून तिने ते सगळ केल न आज ती जात होती एक सून म्हणून एक बायको म्हणून एका नवीन उंबरठ्यावर ,एक नवीन संसारात ...हे चित्र पाहून जमलेले सगळेच डोळ्यातून येणारे अश्रू थांबवू शकले नाहीत. यात मी कुठे होते ?शेवटी वर्षभर चालू असणाऱ्या ह्या सोहळ्याचा काचेतून मन भरून आनंद लुटणारी मी माझी मोना सोडून जाताना स्वतःला आवरू शकली नाही आणि खळदइशी माझ्याभोवती असलेली काच फुटलेल्याचा आवाज झाला कदाचित तो आवाज कुणापर्यंत पोहचलाच नसेल पण इतके वेळ स्वतःला न राहून माझ्याही भावनेला आता अश्रुसोबत वाहायला जागा मिळाली. आणि अशा प्रकारे मोनाची गाडी हळू हळू दिसेनाशी झाली. आज मी देहाने जरी मोनासोबत नसली तरी माझ्या भावनेत मोनाच्या सुख दुखात एक आशिर्वाद म्हणून मी नक्कीच राहील. तू तुझा संसार असाच आनंदाने बसव खूप खुश राहा परमेश्वराकडे मी एवढच मागेल....आणि शेवटी सगळ्यांचा निरोप घेत आम्ही घरी परतलो मी मात्र आता सगळ काही पाहत होते त्या काच फुटलेल्या फोटोतून      


(मोनाताईच्या  लग्नात माझ्या आजीचा फोटो पण आम्ही घेऊन गेलो होतो पण धावपळीत त्याची काच फुटली गेली ...." आज आई आमच्यात नाही पण नक्कीच आम्ही जे आहोत ते तिच्याच असण्यामुळे " ..आमच्या सगळ्यात मोना ताई तिला खूप लाडकी ..कदाचित आई तू जर असते तर तुझ्या मोनाच लग्न अगदी पूर्ण वाटल असत आम्हाला ..हेच लग्न आमच्या आईच्या नजरेतून मांडत आहे )