शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६
बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६
valentine Day: प्रेम दिवस
Valentine Day: प्रेम व्यक्त करण्याचा दिवस
काल संध्याकाळी मम्मीने विचारले ,हा Valentine Day काय असतो ? का करतात हा साजरा? तिला सांगताना मी आपल असच म्हटल मला की माहित काय असतो ..पुढे तिला समजून सांगताना म्हटल अग असतो एक दिवस ज्या दिवशी प्रेम व्यक्त केल जात ..मुल मुली एकमेकांना त्यांच प्रेम व्यक्त करतात.ती अजून पुढचं मला काय विचारणार तेव्हा मीच म्हटल काय ग कालच्या मालिकेत काय झाल न कशीबशी माझी सुटका करून घेतली. आता आजकालच्या पिढीचा Valentine Day तिला समजून सांगायला माझ्याकडे कोणतेच शब्द आत्तापर्यंत तरी न्हवते.
गंमतीची बाब अशी आहे कि हे प्रेम व्यक्त करण्यातच काही जणांची जिंदगी निघून गेली.त्यांच्या ह्या साऱ्या भानगडीत साधत ते रेडीमेड ग्रीटिंग्ज वाल्यांच.आता पहिल्या सारख कुठ राहिलंय कि एखादा प्रेमवीर स्वतःच्या भावना एखाद्या कागदावर लिहून आपल्या प्रेयसीला देतो ,आता काय एक मोठ ग्रीटिंग (२००रु च्या पुढे ) घ्यायच ...TO ...FROM या रिकाम्या जागा भरायच्या नि पोहच करून द्यायचं, बिचारी ती मुलगी हे घेऊन खुश होते ,आतील मजकुर वाचून गालातल्या गालात हसते आणि होकार देते पण , मी तर म्हणतो तो होकार खरा तर ह्या सुंदर ओळी लिहिणाऱ्या त्या कवीलाच दिला गेला असेल ,बिचाऱ्याने कुणासाठी तरी लिहिलेल्या असतील पण REJECT झाल्याने दुसरयासाठी का होईना उपयोगी आल्या.
दोघांच एकमेकांकडे पाहण,चोरून भेटण ,चोरून बोलण सुरु होत, सगळ सुरळीत चालू असताना कुठ तरी माशी शिंकते. घरी समजणं म्हणा ,अभ्यासच तेन्सिओन म्हणा ,करिअर च म्हणा अशा कोणत्यातरी कारणाने दोघांच BRECKUP होत...आता सगळ बंद होऊन जात. दिवसामागून दिवस जायला लागतात आणि परत नवीन वर्षातील आनंद,नंतर येणारी थंडी संपत संपत पुन्हा १४ फेब्रुवारी यायला लागतो ,गल्ली अन गल्ली ,दुकाने परत एकदा प्रेमाच्या लाल रंगाने अगदी बहरली जातात व मघाशी तुटलेली मन ,बिख्रलेली स्वप्न हातात परत एक मोठस रेडीमेड ग्रीटिंग्ज घेऊन नवीन जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात.
गुलाबाच्या त्या नाजूक पाकळीसारख प्रेम असत ...
टेडी बिअर च्या त्या मऊ मऊ कापसापेक्षा पण लुसलुशीत प्रेम असत ....
सोडवायला गेलात तर अडकून हरवून जाल या विचित्र कोड्यात ..
कारण ..थोरामोठ्यांनाही शब्दात वीणता न येणाऱ्या भावनेचं सुंदर अस घरट प्रेम असत ...
To be continue

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६
"त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत........."
( शिक्षण संपवून बाहेरून अगदी सोप्या वाटणाऱ्या या दुनियेत आपण पडतो..तेव्हा सुरु होतो लपंडाव यश आणि अपयशाचा ..यात बहुदा अपयशच जिंकत जात आणि हरत जातो आपणही,आपल्या यशाला दूरवर पाहत असताना...पण हे मिळालेलं अपयश हा आजचा भाग असतो कारण आपल्याला उद्या परत धावायचं असत मिळवण्यासाठी "यश" ...जे फक्त असत तूमचं !! )
"त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत........."
"मावळणाऱ्या सूर्याकडे
पाहताना जर तुला जाणवल की आजचा दिवस व्यर्थ गेला तर ........
तर ....आज झोपताना मनात तू एकच गोष्ट ठेव उद्याचा उगवणारा सूर्य
नव्या उमेदीने पहायचाय तुला ! आज काही मिळवलं नाही म्हणून निराशेने खचून जाऊ नकोस कारण..
कारण ...उद्या काय करायचय हे ठरवायचं अजून तुला !"
" आज तू जे मिळवण्यासाठी खूप
प्रयत्न केलेत,धावपळही केली पण ..काहीच मिळाल नाही अस समजून तुझ सामर्थ्य कमी होऊ
नको देऊस कारण ..
कारण ..आज जे काही तुला मिळाल नाही कदाचित उद्याचा दिवस त्याहूनही सुंदर
अस काहीतरी तुझ्यासाठी घेऊन येणार असेल.."
"आज जेव्हा तू मोकळ्या
हाताने घरी यायला निघशील तेव्हा नक्कीच तुला वाटेल समोर फक्त अंधार आहे वाट तर
कुठेच दिसत नाही ..पण जिद्द तुझी सोडू नकोस कारण..
कारण ..उद्या तुला त्याच अंधारामधूनपण वाट सापडेल जेव्हा तू याच
जिद्दीने पुन्हा चालायला लागशील.."
"एव्हाना तुझ्यात असलेल्या
अफाट शक्तीचा तुला अंदाजही आला नसेल..पण तो तूच आहेस जो अशक्य ते शक्य करू शकशील .
आज केलेल्या प्रयत्नातून
यश भलेही नसेल मिळाल पण अपयश मात्र पचव.. कारण..
कारण...तुझ्या रक्तात लढण्याची ती वीज अजूनही वाहत आहे जी तुला उद्या
नक्कीच पोहचवेल त्या ठिकाणी जिथे जाण्यासाठी आज तू चालत आहेस मोकळ्या हाताने ..
त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत.......... त्या मावळणाऱ्या सूर्याकडे
पाहत !!!"
-मोहनिश महंमद खुंटे.
शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............
"प्रेम" या शब्दाला काही बंधनं नाहीत, कोणत्या अटी नाही.....ते फक्त समजून घ्यायचं न वाहत जायचं आपण त्या मध्ये बिनधास्त कारण थांबायला इथे कोणताच ब्रेंक नसतो न नसतो थांबवायला कोणता स्पीडब्रेकर !!
नुकतेच कॉलेज मध्ये प्रवेश केलेल्या एका तरुण मुलाच प्रेम आज कवितेतून मांडत आहे, तुमच्या जीवनाशी निगडीत कोणत्या गोष्टी जाणवल्याच तर निव्वळ एक योगायोग समजावा .
नुकतेच कॉलेज मध्ये प्रवेश केलेल्या एका तरुण मुलाच प्रेम आज कवितेतून मांडत आहे, तुमच्या जीवनाशी निगडीत कोणत्या गोष्टी जाणवल्याच तर निव्वळ एक योगायोग समजावा .
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............
प्रिय सखे ,
पहिल्या पावसाच्या त्या सरीमध्ये चिंब भिजताना
माझ्यासवे पावसात भिजशील का ?
खडकवासला धरणा जवळ ते गरम मकेच कणीस
माझ्यासोबत खाशील का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............
गुलाबी थंडी मध्ये हात माझा हातात घेऊन
दूर दूर पर्यंत चालशील का ?
मग असाच पुढे कुठेतरी माझ्यासोबत गरम गरम
कांदेभजी अन वडापाव खाशील का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?...............
जानेवारी महिन्यात पडणाऱ्या गर्द अशा धुक्यात
बाईक वरून माझ्यासोबत फिरायला येशील का ?
आणि असाच पुढे जाऊन कुठेतरी एका टपरीवर
गरम चहाचा स्वाद माझ्यासोबत घेशील का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............
कॉलेज मध्ये लेक्चर चालू असताना तू पहिल्या बेंच वरून
हळूच माझ्याकडे चोरून पाहशील का ?
नि त्याचवेळी मी ही तुझ्याकडे पाहत असताना
तुझ्या त्या गालावरच्या खळीने मन माझ खुलवशील का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............
परीक्षेच्यावेळी रात्री बेरात्री कॉल/मेसेज करून
अभ्यासाची तयारी किती झाली, काय काय महत्वाच करू अस सांगशील का ?
रिझल्ट माझा माझ्यासमोर पाहून थोड वाचल असत तर पास तरी झाला असता !
अस हक्काने म्हणशील का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..................
कॉलेजच्या DAYS मध्ये माझ्या वेगवेगळ्या विचित्र अवतारात
तू तुझे छान साडी घातलेल्याचे फोटो माझ्यासोबत काढशील का ?
GATHERING ला जेव्हा मी स्टेज वर एखाद गाण गायिल तेव्हा
उभ राहून मोठ्याने टाळ्या वाजवशील का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............
उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तू न मी असा मस्त एखादा
LOVE STORY असलेला पिक्चर थिएटरमध्ये पाहशील का ?
आणि पुढे उन्हातून चालून आल्यावर आले लिंबू टाकून
उसाचा रस माझ्यासोबत पेशिल का ?
आणि पुढे उन्हातून चालून आल्यावर आले लिंबू टाकून
उसाचा रस माझ्यासोबत पेशिल का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?................
TRIP ला जाताना बस मध्ये तुझ्याशेजारच
TRIP ला जाताना बस मध्ये तुझ्याशेजारच
सीट माझ्यासाठी पकडून ठेवशील का ?
मग रात्री छानशी ROMANTIC गाणी एकाच
HEADPHONE मध्ये माझ्यासोबत ऐकशील का ?
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..................
आता एवढ सगळ जर तू केल आहेसच तर
स्वप्नातून माझ्या बाहेर येऊन खरोखरच कुठेतरी भेटशील का?
आता एवढ सगळ जर तू केल आहेसच तर
स्वप्नातून माझ्या बाहेर येऊन खरोखरच कुठेतरी भेटशील का?...................
मनातून आलेल्या माझ्या कवितेला "प्रेमाने" नाव एखादे देशील का...............
नाव एखादे देशील का? .................
सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?...............
मोहनिश महंमद खुंटे.
(second yr ला लिहायला घेतलेली कविता आता पूर्ण करत आहे.)

रविवार, १३ डिसेंबर, २०१५
फुटलेल्या फोटोतून रडताना .........
फुटलेल्या फोटोतून रडताना .........
तिला रडताना, तिच्या पप्पांना तिने मिठी मारताना पाहिलं अन
शेवटी न राहून माझ्यापण काळजातून तिच्यासाठी भावना निघाल्या पण मी रडणार तरी कशी ? शेवटी वर्षभर चालू असणाऱ्या ह्या सोहळ्याचा
काचेतून मन भरून आनंद लुटणारी मी माझी मोना सोडून जाताना स्वतःला आवरू शकली नाही.आतापर्यंत
सर्व नातेवाईक आलेले पै पाहुणे आमची भेट घेऊन जात होते, लग्न मस्तच झाल ,खूपचं छान झाल अशा प्रकारच्या भावना सगळंच्या कडून
होत्या. त्याने तिला सगळच दिल होत म्हणा पलंग,गादी कपात भांडी , वंदना ने पण रुखवत असा की सजवला होता जणू नवीन
संसारच ..हो तर नवीन संसारच होता माझ्या मोनाचा..प्रत्येक बापाला वाटत माझ्या
मुलीला मी त्या सगळ्या गोष्टी देल ज्या तिला तिच्या संसारात उपयोगी येतील न हे सगळ
जुळवा जुळाव करण्यासाठी न जाणो किती तरी रात्री लहना अगोदर तो झोपला देखील नसतो.
मोनाला तर ते सगळच मिळालाय पण तिला अजून एक अमूल्य अस जर की मिळाल असेल तर तिचे “पप्पा”. मोना नांदायला जाताना पपांच्या गळ्यात पडून रडत
होती कदाचित तिला ते सगळ आठवत असेल जे एका थोरल्या मुलीला जाणीव असते कि
आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी लहान भावन्दासाठी आपला बाप किती कष्ट करतोय ते. ते
चित्र पाहताना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलेले होते.तस म्हणजे मागच्या एक
वर्षापासून सुरु असलेला असलेला हा लग्न सोहळा आज कुठेतरी संपूर्ण होत
होता.साखरपुडा तसा मार्च मधेच झाला होता तेव्हापासून ते आजपर्यंत एक एक दिवस आम्ही
सर्वच मोजत आलो होतो. खर आहे मुलीच्या लग्नात जो जास्त रडतो तो तिचा बापच असतो. मी
मात्र लांबून सगळ फक्त पफात होते. मोनाला कधी एकट जाऊ दिल नाही ती शाळेत जायची
फलटण ला तेव्हा मीच सकाळी सोडायला जायचे. आज मोना असाच तिच्या नव्या दुनियेत जात
आहे न मात्र दुरून हे पाहत आहे. रडू तर मला पण येत होताच.
एक एक वस्तू जोडायची, गावात लग्नाची तशी चर्चा झालीच होती.नवरी मुलीच्या आईचा थाट तसा
जोरातच होता पण वंदनापण गेली काही दिवसापासून लग्नाच्या गडबडीतच होती. काल तर
विशेषच झाल आज पहिल्यांदाच गावातल्या बायका घरी जमा झाल्या असतील.बांगड्याचा
कार्यक्रम वंदनानेच जोरातच केला.घरात परंपरेनुसार जात पुजल गेलं बायकांनी अगदी
सुरात गाणी म्हणायला सुरवात केली सार्या घरात अगदी आनंदच वातावरण होत.अगदी वरच्या
आळीपासून बायकांची गर्दी होती. सुहासिनी जेवणाचा कार्यक्रम पण मस्त झाला.मी मात्र आज अगदीच खुश
होती आणि खुश का नसणार मी जेव्हा बाकी मुलींची लग्न होताना पहायची तेव्हा वाटायचं
माझ्यापण मोनाच असच लग्न करायचं आणि आज अगदी तसाच होत होत.

मुंबईची पाहुणी, विंचुर्णीची, बिजवडीची,दौंडची सगळी जमा झाली होती. मला तर अगदी
हरकून गेल्यासारखं होत होत.
लग्न म्हटल कि हळद आलीच, पोरगी पिवळ्या साडीत न गालावरच्या
हळदीमध्ये अजून च खुलून दिसते. कालच हळदीचा कार्यक्रम
झाला . हळद लावयला सुरवात झाली न सगळ्यांनी अगदी नाचून नाचून तो क्षण अगदी
अविस्मरणीय बनवला. तो जेव्हा मोनाला हळद लावायला आला न मोनाच्या डोळ्यात पाणी आले
तो हि रडला खर तर त्याच्या डोळयातून मीच रडत होते आज आमची मोना खरच लग्न होऊन जात
आहे या भावनेने ....
आजपर्यंत या दिवसाची आतुरतेने वाट पाहणारे आज पहाटेच उठलो रात्री
मेहंदीच्या नादात पहाट कधी झाले समजलच नाही.मी मात्र तशीच जागी आहे माझ्या घरातला
हा आनंद डोळेभरून पाहण्यासाठी...आज लग्नाच दिवस घरातून निघत असताना धावपळ हि होत
असतेच वर्हाड तास की जास्त लांब जाणार न्हवत पण तरी आम्हा सगळ्या बायकांची
म्हातार्यांची न्यायची सोय चांगली केली होती. मी या गोंधळात कुठे होते ? आज मी पण माझ्या मोनाच्या लग्नात जायला अगदी उत्साहाने तयार झाले न गाडीत
अगदी समोर बसून आम्ही वाजत गाजत गावातून मिरवणुकीत निघालो. आज या घरातून आमच्या
मोनाचा शेवटचा दिवस होता तस ती इकडे येतच राहील हो पण आज जे तिच स्वतःच घर आहे ते
उद्या तीच माहेर होणार असणार.
" खर तर देवाने मुलीला जन्माला घालून खूप सुंदर असा धागा
बनवलाय हा धागा दोन घराला,दोन परंपरेला अगदी हळुवार पणे जपत
असतो " हि नाती सांभाळताना ज्या काही गोष्टी एक स्त्री करते खरच हे फक्त एक
स्त्रीच समजू शकते.
आणि आम्ही लग्न स्थळी
पोहचलो. हळू हळू बाहेरच्या गावची लांबून येणारी नातेवाई जमा होत होती दुपारची वेळ
न रविवारचा दिवस त्या मानाने गर्दी व्हायला सुरुवात झाली नवऱ्याच वर्हाड पण
एव्हाना कार्यालयात पोहचल होत. जवळपास १००० पेक्षा जास्तच लोक जमा झाली होती
सगळ्याची धावपळ दिसत होती कुणी जेवणाच्या ठिकाणी पळतंय तर कुणी अक्षता पोहचल्या का
नाही ते पाहत होते. नवरदेवाची घोड्यावरती वरात आली तशी इकडे मंडपात प्रमुख
पाहुण्याचे सत्कार सुरु करण्यात आले फलटणचे राजे, आमदारसाहेब नवरा-नवरीला आशिर्वाद
द्यायला आले होते.या धावपळीत मी कुठे होते ? मी तिथच मंडपात
जवळून सगळ पाहत होते.
अशा प्रकारे लग्नाला सुरुवात झाली. एक एक मंगलाष्टकं भान्तिजी
पुकारत होते , एका बाजूने त्यांचा आवाज कानावर पडत होता तर
दुसरीकडे माझ्या डोळ्यासमोर अगदी लहानाची मोठी होणारी मोना येत होती लहन असताना
तिच्या येण्याने माझा परिवार अगदी खुश झाला होता न का होणार नाही अगदी
लहानपणापासूनच मोना तशी गुणवान होती हळू हळू ती मोठी होत गेली न शाळेत पुढे
कॉलेजला ती तिच्या सोबत आमच पण नाव कात गेली. मी मात्र त्या लहान मोनाच्याच आठवणी
मध्ये रमले असता अचानक फटाक्यांच्या आवाजाने माझे भान जाग्यावर आले. राहुलरावांनी
मोनाला वरमाळ घातली न जमलेल्या पै पाहुणे आप्तेष्ट मित्रपरिवार सगळ्यांनी
पुष्पांचा वर्षाव वर-वधू वर केला.
गेली वर्षभर याच क्षणासाठी सुरु असलेली धावपळ आज कुठतरी शांत झाली.जेवणाच्या पंगती सुरु झाल्या पंच पक्वनाची गोडी आणि मोनाच्या ओठावरच गोड हसू पाहून मन भरून जात होत न हळू हळू मी मलाच शोधू लागले.मी तिथच होते पाहत हा सगळा सण.

आता वेळी आली होती ती निरोप घ्यायची. "माणसाच कस असत ना त्याला
एक वेगळीच कला देवाने दिली असते आतून मन रडत असल तरी ओठावर हसू दाखवायचं न
चेहऱ्यावर समाधान!" असाच इथ पण झाल होत तासाभरापूर्वी फोटोसाठी हसणारी लोक
लग्नात हसून गप्पा मारणारी तीच लोक यांना मुलगी निरोप घेतांच नक्की की होत की
माहीत. तस म्हटल तर स्त्रीलाच रडण्याचा हक्क असतो म्हणे का तर त्याचं काळीज
फुलासारखं असत अगदी नाजूक न पुरूषांच कठोर दगडासारख ! आज मी जवळून पाहिलं मुलगी
सासरी नांदायला जातानाची जी वेळ असतेना तेव्हा तिथ तिच्या जवळ न स्त्री असते न
पुरुष तिथ फक्त एक मन असत एक कलीच असत जे गेल्या २३-२४ वर्ष फक्त त्या
मुलीच्यासाठी जगात आलेल असत. आज तिचा बाप पण तिच्या गळ्यात पडून रडत होता ,वंदना कुणाच्या तर खांद्यावर डोक
ठेऊन रडत होती मैनु मीनल ला जवळ घेवून ती रडत होती. मोना ने गेली ५ वरच तिच्या
भावंडान अगदी आईबापा सारख संभाळल होत.दादू कुठाय दादू
कुठाय अशी तिने हक मारली दादुला जवळ घेऊन दिने मिठी मारली आणि बोलली सगळ्यांची
काळजी घे कुणाला रडू देऊ नकोस. आज ती सगळी कर्तव्य पूर्ण करून पुढे जात होती एक
मुलगी म्हणून ती घरात सोन्यासारखी राहिली एक पोर म्हणून आई बापाला सगळ दिल एक मोठी
ताई म्हणून तिने ते सगळ केल न आज ती जात होती एक सून म्हणून एक बायको म्हणून एका
नवीन उंबरठ्यावर ,एक नवीन संसारात ...हे चित्र पाहून जमलेले
सगळेच डोळ्यातून येणारे अश्रू थांबवू शकले नाहीत. यात मी कुठे होते ?शेवटी वर्षभर चालू असणाऱ्या ह्या सोहळ्याचा
काचेतून मन भरून आनंद लुटणारी मी माझी मोना सोडून जाताना स्वतःला आवरू शकली नाही
आणि खळदइशी माझ्याभोवती असलेली काच फुटलेल्याचा आवाज झाला कदाचित तो आवाज
कुणापर्यंत पोहचलाच नसेल पण इतके वेळ स्वतःला न राहून माझ्याही भावनेला आता
अश्रुसोबत वाहायला जागा मिळाली. आणि अशा प्रकारे मोनाची गाडी हळू हळू दिसेनाशी
झाली. आज मी देहाने जरी मोनासोबत नसली तरी माझ्या भावनेत मोनाच्या सुख
दुखात एक आशिर्वाद म्हणून मी नक्कीच राहील. तू तुझा संसार असाच आनंदाने बसव खूप
खुश राहा परमेश्वराकडे मी एवढच मागेल....आणि शेवटी सगळ्यांचा निरोप घेत आम्ही घरी
परतलो मी मात्र आता सगळ काही पाहत होते त्या काच फुटलेल्या फोटोतून
(मोनाताईच्या लग्नात माझ्या आजीचा फोटो पण
आम्ही घेऊन गेलो होतो पण धावपळीत त्याची काच फुटली गेली ...." आज आई आमच्यात
नाही पण नक्कीच आम्ही जे आहोत ते तिच्याच असण्यामुळे " ..आमच्या सगळ्यात मोना
ताई तिला खूप लाडकी ..कदाचित आई तू जर असते तर तुझ्या मोनाच लग्न अगदी पूर्ण वाटल
असत आम्हाला ..हेच लग्न आमच्या आईच्या नजरेतून मांडत आहे )
गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५
रविवार, १ नोव्हेंबर, २०१५
"एकतारा" - अडचणीने भरलेल्या आयुष्याच उत्तर ...........
“To find someone close ,close in such way that he will always be there for all the stuffs which you need to share with that person”.
life मध्ये जस आपण पुढे जात असतो हळू हळू आपल्या सोबत तशाच गोष्टी घडत जातात ज्या आपल्या स्वभावाची प्रतीरुत्ती भासवतात .मग अशातच त्या धाडणाऱ्या घटना एकतर आपल्याला त्रासदायक वाटू लागतात नाहीतर या आपल्याशीच का घडतात या संभ्रमात आपण पडलो जातो.मग खर पाहिलं तर हे सुरु असलेल चक्र आपल्या विचारांच्या पातेवरच बनल असत आणि हि गोष्ट जोपर्यंत माणसाला समजत नाही तोपर्यंत माणूस पण तारेला अडकलेल्या कपड्याच्या चिंधी सारखे अडकून जातो त्याच्या रोजच्या दुनियेत ..त्याला कंटाळवाण्या वाटणाऱ्या दुनियेत " येणारा प्रत्येक उन्ह वर पाउस झेलत तो वाट पाहू लागतो त्या तारेतून सुटका होईल याची.
आयुष्य आपल आहे त्यामध्ये येणाऱ्या समस्या आपल्या आहेत मग ते सोडवायच्या देखील आपल्यालाच आहेत हे साध गणित माणूस चुकत चालला आहे.एखाद्या मैफिलीत ती रंगण्यासाठी जशी सगळी वाद्ये एकमेकांना साथ देतात तेव्हा कुठ ती मैफिल रंगली जाते तबला,पेटी,डमरू,वीणा आणि अनेक छोटी मोठी वाद्य याचा सुरेल संगम होते न ती मैफिल रंगते .आपल्या आयुष्याच्या मैफिलीमध्ये असेच सोबतीला वाद्य मिळतील हे गृहीत धरून चालतो माणूस पण जीवन जगत असताना आपण असतो ती फक्त "एकतारा". जी शब्दाना ताल देते अन वाजत राहते एकटीच अगदी शेवट पर्यंत. ती एकतारा आपण आहोत .
कोणत्याही गोष्टीचा आनंद व्यक्त कार्यासाठी माणूस दारू पिऊन तो साजरा करतोय ,आज हसण्यासाठी त्याला सेल्फी ची मदत घ्यावी वाटू लागली आहे ,मित्राशी बोलायचं तर ते फक्त फोन वरूनच सुरु आहे आणि आजकाल तर प्रेम जरी करायचं म्हटल तरी ते फक्त अट म्हणूनच. खर पाहायला गेलं तर माणसाला मिळालेले भावना ह्याचखऱ्या त्याला त्याच्या तणावापासून दूर करू शकतात. आज फेसबुक मधून तुम्ही मैत्रीचा हात पुढे करताय आणि तुमच्या आवडीनिवडी माहित असलेल्या मित्राला तुम्ही विसरत चाललाय .दुखामध्ये काय करायचं याच उत्तर कुठेच मिळणार नाही कारण अशा आजपर्यंत ते उत्तर कुणाला मिळालच नाही. स्वतःच्या सुखामध्ये सगळ्यांना सामील करून घ्या आणि दुसरयाच्या दुखत न बोलावताच जा मग पहा स्वतःच्या आनंदाहुनही दुसर्याचा आनंद अतिप्रिय वाटायला लागेल. आपल्याला कोण मदत करेल याची वाट पाहत राहिलात तास तसेच राहाल अगदी मरेपर्यंत पण जर येणाऱ्या अडचणीवर मत करून हसत सामोरे जाल तर सुखाची दारे सदैव खुली राहतील तुमच्या साठी .तर नको आहेत आपल्याला ती अनेक वाद्य आपले जीवन संगीत सुरेल बनवण्यासाठी आपण मात्र "एकतारा " आहोत आपल्या जीवनासाठी.
- मोहनिश महंमद खुंटे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)