वेदनांचा जीव तू दाभणाने ओवीला
गरिबीच्या बागेत तुझ्या मोगरा फुलविला...
उन्हाची ना फिकीर, ना न्हवती तमा काट्याची तुला..
देऊन सुख लेकरा जन्म दुखाचा भोगिला..
दारिद्र्याच्या भयाण माळरानी बीज कष्टाने तू रोविला
चालता काट्या कुट्यातून घामाने पदर तुझा भिजला
अज्ञानाचा डोंगर तूझ्या लेकरासाठी पार केला
अडाणी आईच्या नशिबी तू एक मास्तर घडविला
क्रमश:
- मोहनिश महमंद खुंटे
असेन जर मजला , मानव जन्म कधी |
उत्तर द्याहटवाआई तुझ्याच पोटी , पुन्हा जन्मावेसे वाटते||